7.3 C
New York
Friday, March 31, 2023

Buy now

नाशिकमध्ये केवळ ॲडमिट रुग्णांसाठीच आता Remdesivir मिळणार

नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे

नाशिक : नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यात आता केवळ जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत अशा रुग्णांनाच रेमेडिसीवर मिळणार आहे. जर ते हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्यास ते बाहेरून खरेदी करता येणार आहे. पण यासाठी हॉस्पिटलला प्रिस्क्रिप्शनवर मागणी करणे बंधनकारक असणार आहे.

नाशिक जिल्ह्यात विविध मेडिकलवर तुटवडा आणि होणारी गर्दी बघता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. झी24तास याबाबत बातमी दाखवली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पुढे आलं होता. त्यानंतर बातमीची दखल घेत प्रशासनाने आता हा नवा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी विविध देशांमध्ये कोरोनावर औषध शोधण्याचं काम सुरु आहे. पण सध्या रेमेडिसीवर (Remdesivir)

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरलं जात आहे. रेमेडिसीवर (Remdesivir) अँटीवायरल औषध आहे.

संबंधित बातमी : Curfew : रात्री 8 नंतर बाहेर पडायचे असेल तर या गोष्टी जवळ असणं आवश्यक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -

Latest Articles